सप्टेंबरपासून LPG सिलिंडरपासून आधार कार्डापर्यंत काही मोठे बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होईल! या बदलांमध्ये LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींपासून क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याशी संबंधित काही विशेष घोषणा देखील होऊ शकतात.
ऑगस्ट महिना संपण्यास आता काहीच दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, नवीन महिन्यात काही मोठे बदल होतात, जे सामान्य लोकांच्या खिशावर थेट परिणाम करतात. सप्टेंबर महिन्यापासूनही असेच काही विशेष बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या खिशावर परिणाम होईल. चला तर मग पाहूया सप्टेंबर महिन्यात कोणते बदल होणार आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होईल?
या भागात जोरदार पावसाचा इशारा; पहा तुमच्या भागात काय परिस्थिती राहणार!
पहिला बदल: LPG सिलिंडरच्या किंमती
साधारणपणे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल होतो. त्यामुळे यावेळीसुद्धा LPG सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल होण्याची अपेक्षा आहे. मागील महिन्यात कमर्शियल LPG गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये ८.५० रुपयांनी वाढ झाली होती, तर जुलै महिन्यात त्याच्या किंमतीत ३० रुपयांची घट झाली होती.
दुसरा बदल: ATF आणि CNG-PNG च्या दरांमध्ये बदल
LPG सिलिंडरच्या किंमतींसोबतच, ऑइल मार्केट कंपन्या हवाई इंधन (ATF) आणि CNG-PNG च्या किंमतींमध्येही बदल करतात. त्यामुळे १ सप्टेंबरला त्यांच्या किंमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार का ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ठाम उत्तर, म्हणाले ‘अनेक योजना..
तिसरा बदल: फेक कॉल्सशी संबंधित नियम
१ सप्टेंबरपासून फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण आणले जाऊ शकते. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना फेक कॉल्स आणि मेसेजवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ट्रायने जिओ, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल सारख्या कंपन्यांना ३० सप्टेंबरपर्यंत १४० मोबाइल नंबर सीरिजसह सुरू होणारे टेलिमार्केटिंग कॉल्स आणि कमर्शियल मेसेजिंगला ब्लॉकचेन बेस्ड DLT प्लॅटफॉर्मवर शिफ्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
चौथा बदल: क्रेडिट कार्डसंबंधी नियम
१ सप्टेंबरपासून HDFC बँक यूटिलिटी ट्रांजेक्शनवर रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा ठरवणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना दर महिन्याला फक्त २,००० पॉइंट्स मिळू शकतील. थर्ड पार्टी अॅप्समधून शैक्षणिक पेमेंट केल्यास HDFC बँक कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स देणार नाही. सप्टेंबर २०२४ पासून IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्डवरील देयकाची किमान रक्कम कमी करणार आहे आणि पेमेंटची तारीख १८ दिवसांवरून १५ दिवसांवर आणली जाईल. तसेच, १ सप्टेंबर २०२४ पासून UPI आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी RuPay क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांप्रमाणेच रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
पाचवा बदल: महागाई भत्ता
सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकार ३% महागाई भत्त्यात वाढ करू शकते. सध्या कर्मचार्यांना ५०% महागाई भत्ता मिळत आहे, जो ३% वाढल्यानंतर ५३% होईल.
सहावा बदल: आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शेवटची मोफत तारीख
फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ सप्टेंबर २०२४ आहे. त्यानंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. यापूर्वी, फ्री अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२४ होती, जी वाढवून १४ सप्टेंबर २०२४ केली गेली होती.