shri swami samarth: घाटातील एक थरारक अनुभव; विनोद परब यांच्या शब्दांत स्वामी अनुभव !

shri swami samarth: ड्रायव्हर विनोद परब यांनी अनुभवलेला हा रोमांचक आणि थरारक प्रसंग वाचून अंगावर शहारे येतील. विनोद परब एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होते, ज्यात रात्रीची शिफ्टही होती. घरी परतण्यासाठी ड्रॉपची व्यवस्था होती आणि हा अनुभव ड्रायव्हर विनोद परब यांचा आहे. चला तर, त्यांच्याच शब्दांत हा अनुभव वाचूया.

स्वामींचे कधी ना पाहिलेले देखण रूप पाहन्यासाठी येथे क्लिक करा 

shri swami samarth: माझं वय साधारणतः तीस-पस्तीस आहे. माझ्या कुटुंबात माझी पत्नी आणि चार वर्षांची मुलगी आहे. आम्ही मुंबईत राहतो आणि उदरनिर्वाहासाठी मी स्वतःच्या गाडीवर ड्रायव्हिंग करतो. दिवसभर मुलांचे भाडे सोडतो आणि संध्याकाळी ड्रॉपचं काम करतो. नुकतीच मी जुनी गाडी विकून नवीन स्विफ्ट डिझायर घेतली होती. शनिवारी सुट्टी असल्याने आम्ही गावी नाशिकला जायचं ठरवलं.

shri swami samarth: शनिवारी नाशिकचं भाडं सोडल्यानंतर मी उशिरा घरी आलो. वेळ वाया न घालवता, रात्रीचे जेवण करून पत्नी आणि मुलीला घेऊन गावी जायला निघालो. मुंबई सोडल्यानंतर कसारा घाटात आमचा प्रवास सुरू झाला. माझी मुलगी मागच्या सीटवर बसून बाहेरचा नजारा बघत होती. कसारा घाटाचा रस्ता सुनसान आणि भयानक वाटत होता. गाड्यांची वर्दळ कमी होती.

अर्धा घाट पार केल्यानंतर अचानक गाडी थांबली. पत्नी आणि मुलगी दोघीही झोपून गेल्या होत्या, अचानक भीतीने जाग्या झाल्या. काही दिवसांपूर्वी गाडीची तपासणी करून घेतली होती, सर्विसिंगही केली होती. इंधनाची टाकीही फुल्ल होती. बाहेर खूप गारवा होता. आणि निरव शांतता होती. रस्त्याच्या उजव्या बाजूला उतार आणि गर्द झाडी होती. पत्नी गाडीमधून बाहेर बघत होती, तिच्या चेहऱ्यावरचे भाव भयानक वाटत होते. मी गाडी तपासली पण काही कळेना.

तेवढ्यात मागून हेडलाईट्स दिसल्या. एक मोटरसायकल जवळ येऊन थांबली. त्या माणसाने हेल्मेट काढून विचारपूस केली. मी त्याला गाडीबद्दल सांगितलं. त्याने सांगितलं, की पुढे घाट संपल्यानंतर एक गॅरेज आहे, तिथे मेकॅनिक मिळेल. तो मला तिथपर्यंत सोडायला तयार झाला. पत्नीने गाडीची काच खाली केली होती, आणखी एका व्यक्तीची सोबत मिळाल्याने तिची भीती काहीशी कमी झाली होती.

 Swami Samarth :मी थोडा विचार करून त्या माणसासोबत जायला निघालो. पत्नीला समजावलं, तिला धीर दिला. मोटरसायकलवरून मेकॅनिक आणायला गेलो. अर्ध्या तासानंतर परत आलो तेव्हा समोर एक भयानक दृश्य दिसलं. चार-पाच गाड्या थांबल्या होत्या आणि माणसांची गर्दी झाली होती. गाडीत बघतो तर काही बाई माझ्या मुलीला शांत करत होत्या. पत्नी कुठेच दिसत नव्हती. एकाने सांगितलं, की पाच-दहा मिनिटांपूर्वीच ती जोरजोरात आरडाओरडा करत गाडीतून बाहेर पडली आणि झाडीत पळाली. मी वेड्यासारखं वागत झाडीत शिरलो, पत्नीला हाक मारत होतो.

अखेर, झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत ती सापडली. तिला गाडीजवळ घेऊन आलो. ती शुद्धीवर आली पण बोलत नव्हती. चेहऱ्यावरचे भाव निष्क्रिय होते. गर्दीतल्या लोकांनी हॉस्पिटलला जायला सांगितलं. पत्नीला मागच्या सीटवर झोपवलं, मुलगी मांडीवर घेतली. गाडी मेकॅनिक शिवाय सुरू झाली होती. सर्वांचे आभार मानून मुंबईला परतलो. घरी पोहोचल्यावर फॅमिली डॉक्टरला बोलावलं. औषधोपचार सुरू झाले, पण पत्नीची स्थिती सुधारली नाही. दोन दिवस काही फरक न पडल्याने तिला दादरच्या मानसिक तज्ञाकडे घेऊन गेलो.

ट्रीटमेंटमुळे काही दिवसांत सुधारणा झाली, ती हळूहळू बोलू लागली. तिचं मानसिक संतुलन ठीक व्हायला वेळ लागेल असं वाटत होतं. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मी पुन्हा काम सुरू केलं. ऑफिस संपण्याची वेळ रात्री दोनची होती. सर्व ड्रायव्हर्स गप्पा मारत असत. एक ड्रायव्हर अचानक म्हणाला, “संतोष, तुझ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी बसली आहे, पूर्ण चेहरा रक्ताने माखलेला आहे.” सर्वांनी त्याला मूर्ख ठरवलं, पण मी काहीच बोललो नाही.

shri swami samarth त्या रात्री मी गाडी कंपनीतच ठेवली आणि घरी गेलो. दुसऱ्या दिवशी गाडी विकून टाकली. कारण, पत्नी वारंवार सांगत होती, की गाडीच्या मागच्या सीटवर एक मुलगी बसली आहे, पूर्ण रक्तबंबाळ. मित्रांनीही तेच सांगितल्यानंतर मला पटली. चौकशी केल्यावर कळलं, की गाडी बंद पडली होती तेव्हा एका अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीच्या आत्म्याने गाडीत प्रवेश केला होता.

मित्रांनो, वरील माहिती विविध स्त्रोतांवरून एकत्रित करण्यात आली आहे. कृपया याचा अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment