निवास व न्याहारी योजना: दर महिना कमवा; हजारो रुपये!

राज्यातील विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक महत्त्वाच्या जागा, समुद्र किनारे, डोंगरदऱ्या व जंगले याकडे पर्यटकांचा ओघ जास्त प्रमाणात वाढलेला आहे. अशा स्थळांचा अभ्यास केल्यानंतर असे दिसून आले की, बऱ्याच ठिकाणी स्थानिक लोकांकडे दोन ते पाच अतिरिक्त खोल्या व काही घरे, बंगले उपलब्ध आहेत.

पर्यटकांना स्थानिक घरमालकांची घरे अथवा बंगले पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिल्यास दोन फायदे संभवतात.

या दृष्टीने शासनाने झालेल्या बैठकीत निवास व न्याहारी योजनेस मान्यता दिली.

ही योजना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राबवावी, असे ठरले. या योजनेमध्ये कमीत कमी २ खोल्या व जास्तीत जास्त ५ खोल्यांना नोंदणी दिली जाते. निवास व न्याहारी योजनेचे नोंदणी शुल्क रु.५०००/- + १८% जीएसटी पाच वर्षांसाठी आहे.

या योजनेचा अर्ज ऑनलाइन aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करता येईल.

या योजनेचा माहिती अर्ज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ  mtdc. co वर उपलब्ध आहे.

या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून सद्य:स्थितीत महाराष्ट्र एकूण १,७५० हून अधिक योजनाधारक त्याचा लाभ घेत आहेत.

 

निवास व न्याहारी योजना चा लाभ मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment