Indian automobile 2024:भारतामधील ह्या गाड्या होणार बंद!आजकाल प्रत्येक घरात बाईक किंवा कार असते. भारतीय बाजारात अनेक कंपन्यांच्या विविध प्रकारच्या गाड्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहने समाविष्ट आहेत.
सध्याच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. भारतीय बाजारपेठेत आजवर डिझेल गाड्यांचा मोठा वाटा राहिला आहे. डिझेल वाहने विशेषत: मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरली जातात.
अशातच, भारतीय बाजारातील डिझेल गाड्या बंद होणार असल्याची बातमी समोर आली आहे. दिल्ली येथे झालेल्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या ६३व्या वार्षिक संमेलनात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या उत्पादन आणि विकासात वाहन उद्योगाचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात त्यांनी डिझेल गाड्यांवर १० टक्के जीएसटी लावण्याच्या चर्चेवर भाष्य केले. गडकरी यांनी स्पष्ट केले की सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. भाषणात त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेवर भर दिला, रस्ते किंवा एक्सप्रेसवेच्या कामाची जबाबदारी पूर्ण करण्यावर त्यांचा कटाक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिल्लीतील या कार्यक्रमात, गडकरी यांनी डिझेल गाड्यांवरील १० टक्के जीएसटीच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले. सध्या तरी असा कोणताही निर्णय झालेला नाही, पण प्रदूषण टॅक्स लावण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावर वित्तमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे.
नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केले की डिझेल वाहनांच्या विक्रीवर १० टक्के अतिरिक्त जीएसटी सुचविणाऱ्या मीडिया रिपोर्ट्सबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. सरकारने अद्याप असा कोणताही प्रस्ताव विचारात घेतलेला नाही.
2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टासह, डिझेल सारख्या हानिकारक इंधनामुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि ऑटोमोबाईल विक्रीत वाढ करण्यासाठी धोरणांचा विचार सुरू आहे.
भारतीय बाजारपेठेत डिझेल गाड्यांचे महत्त्व लक्षात घेता, काही कंपन्यांनी डिझेल गाड्यांच्या विक्रीतून माघार घेतली आहे. त्यात मारुती सुझुकीचा समावेश आहे. भारतात डिझेल गाड्या बंद करण्याच्या विचारामुळे पुढील काही दिवसांत रस्त्यावर डिझेल गाड्यांची संख्या घटताना दिसेल.