Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर;पुढील ४ दिवसात तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे का!

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर;पुढील ४ दिवसात तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे का! सध्या राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे पावसाचा जोर वाढला असून, विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस झाला आहे.

राजे-महाराजे खायचे, आता तुमच्याही ताटात येणार! ‘काला जिरा’ तांदळाची किमया”

पुणे: राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही जोरदार पावसाची स्थिती आहे. रायगड जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे.

कमी दाबाचे क्षेत्र: वायव्य झारखंड आणि त्याच्या आसपासच्या भागात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून, हे क्षेत्र मध्य प्रदेश, राजस्थान, आणि गुजरात राज्यांच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. सोमवारी उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे नव्याने कमी दाब क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे.

मान्सूनची स्थिती: मान्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, खजुराहो आणि कमी दाबाचे केंद्र, रांची ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. याशिवाय गुजरातपासून महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस: रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर उर्वरित कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

पुढील दोन दिवसांचा अलर्ट:

  • रेड अलर्ट: रायगड, पुणे, सातारा
  • ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक
  • यलो अलर्ट: मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला

राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाचे दिवस अपेक्षित आहेत. काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या विविध स्वरूपांची अनुभूती होईल.

Leave a Comment