Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजना:राज्य सरकारन नवीन एक जीआर काढला;हे झाले बदल

ladki bahin yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: राज्य सरकारकडून महिलांसाठी महत्त्वाची योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांना आर्थिक सहाय्य मिळेल.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीची नवीन यादी जाहीर – तुमचे नाव आहे का?

राज्य सरकारनं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना मिळून 3000 रुपये दिले आहेत. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना 31 ऑगस्टला योजनेचे पैसे दिले जातील. यासंदर्भात नागपूरमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.

महिला व बाल विकास विभागानं योजनेचा विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी नवीन शासन निर्णय काढला आहे. योजनेच्या प्रचार, अर्जांची तपासणी, आणि तांत्रिक अडचणींच्या निवारणासाठी जिल्हास्तरावर अतिरिक्त मनुष्यबळ आणि प्रशासकीय खर्चासाठी 3 टक्के निधीपैकी 1 टक्का निधी राखीव ठेवला आहे.

या निधीचा वापर फक्त आर्थिक वर्ष 2024-25 साठीच करण्यात येणार आहे. उर्वरित 2 टक्के निधी पूर्वीच्या शासन निर्णयानुसार वापरण्यात येईल.

मोठी घोषणा: फक्त या शेतकऱ्यांना मिळणार ‘लाडका शेतकरी’ योजनेचा लाभ

जुलै महिन्यात अर्ज केलेल्या 1 कोटी 8 लाख महिलांना योजनेचे पैसे देण्यात आले आहेत, तर ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या 45 ते 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला पैसे दिले जातील.

राज्य सरकारनं ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरवण्यात आलं आहे

Leave a Comment