Havaman update:पेरणीसाठी घाई करू नका;अशा नियोजनानुसार मशागत केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल!

havaman update:मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले असून, जिल्ह्यातील काही भागात पावसाला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु, तज्ज्ञांच्या मते, पावसाची पहिली सर आली म्हणून पेरणीची घाई न करता पहिल्या पंधरवड्यात योग्य नियोजन आणि मशागत केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकते.

Punjab Dakh:शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार

पेरणीसाठी योग्य तारखा जाहीर!

येथे क्लिक करून पहा’

पहिला पंधरवडा का महत्त्वाचा?

मान्सूनची सुरुवात झाली तरी पेरणीची घाई केल्याने नुकसान होऊ शकते. कमी-अधिक पावसाचे प्रमाण, दोन पावसांमधील मोठा खंड यांसारख्या समस्यांचा परिणाम टाळण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. पहिल्या पंधरवड्यात योग्य मशागत केल्याने खरीप हंगामाचे नियोजन योग्य रीतीने होईल आणि कमी खर्चात अधिक उत्पन्नाची खात्री मिळेल.

पीक नियोजन आणि हवामानाचे महत्त्व

खरीप हंगामात पिकांचे नियोजन करताना त्या भागातील हवामान, जमिनीचा प्रकार, ओलिताची साधने यांचा विचार करून पिकांची निवड करणे आवश्यक आहे. माती परीक्षण, पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा वापर, संकरित तसेच सुधारित वाण, वेळेवर पेरणी, शिफारशीनुसार पेरणीनंतर हेक्टरी झाडांची संख्या, खतांच्या मात्रा, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, तण आणि कीड नियंत्रणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

पूर्वमशागत आणि नांगरट

पिकांच्या पेरणीपूर्वी पूर्वमशागत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी ढेकळे फोडन्यासाठी खोल नांगरट करून २-३ कुळवाच्या पाळ्या करून घ्याव्यात . यामुळे पिकांच्या मुळांची वाढ चांगली होते. आधीच्या पिकाची धसकटे, पाला आणि इतर कचरा गोळा करून कुजवावा व शेत स्वच्छ ठेवावे. यामुळे कीड आणि रोगांचे सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. उपलब्धतेप्रमाणे शेणखत टाकले पाहिजे.

माती परीक्षणाचे महत्त्व

माती परीक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. माती परीक्षण करूनच पुढील नियोजन करणे गरजेचे आहे. माती परीक्षण केल्यास पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता कशी टिकवावी याचे नियोजन करता येते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमिनीच्या गुणधर्मांचे निदान करणे आवश्यक आहे. त्यानुसार नियोजित पिकाला किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यायला पाहिजेत याची माहिती मिळते.

havaman update

सरी-वरंबे आणि सपाट वाफे

मध्यम ते भारी जमिनीत नांगराने उताराच्या आडवे तास घालून सऱ्या तयार कराव्यात. यामुळे पावसाचे पाणी सऱ्यातून जमिनीत मुरते आणि पाणी वाहून जात नाही. सऱ्यांची लांबी ९० मीटरपर्यंत ठेवावी. या पद्धतीमुळे पीक उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होते.

सपाट जमिनीत, जिथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे आणि जमिनीला फारसा उतार नाही, तिथे उताराच्या आडवे वाफे तयार करावेत. रिजरने उभे आडवे ६६ मीटर अंतरावर उताराच्या आडवे खरीप हंगामी वाफे तयार करून घ्यावेत. वरंब्याची उंची २० ते ३० सेंमी ठेवावी. असे वाफे पाणी मुरण्यास मदत करतात.

कीड आणि तण नियंत्रण

पिकांच्या योग्य उत्पादनासाठी कीड आणि तण नियंत्रण महत्त्वाचे आहे. शिफारशीनुसार पेरणीनंतर तण नियंत्रण करावे. तसेच, कीड नियंत्रणासाठी योग्य ती पद्धत अवलंबावी. जैविक कीटकनाशकांचा वापर करून किडींचे नियंत्रण करणे अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ठरते.

शेवटचे शब्द

मान्सूनच्या सुरुवातीला पेरणीची घाई न करता योग्य नियोजन आणि मशागत केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांनी पहिला पंधरवडा नीट नियोजन करून घेतल्यास कमी खर्चात अधिक आणि शाश्वत उत्पन्नाची खात्री मिळू शकते. योग्य मशागत आणि माती परीक्षणाच्या माध्यमातून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये पुरवणे आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या अधिक फायदा होऊ शकतो.

Leave a Comment