CIBIL स्कोर 300 ते 750: तुमचा CIBIL स्कोर कसा सुधारावा; येथे तपासा CIBIL स्कोर: कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा घटक

CIBIL स्कोर म्हणजे काय? बँकेत कर्जासाठी अर्ज करताना बँक तुमचा CIBIL स्कोर तपासते. हा तीन अंकी आकडा तुमच्या क्रेडिट इतिहासाचा सारांश असतो. CIBIL म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड, जे प्रत्येक व्यक्तीच्या क्रेडिट स्कोरची नोंद ठेवते. यात तुमच्या गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड्सवरील व्यवहार इत्यादींची माहिती समाविष्ट असते.

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर;पुढील ४ दिवसात तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे का!

CIBIL स्कोर किती असावा?

CIBIL स्कोर 300 ते 900 दरम्यान असतो. 750 किंवा त्याहून अधिक स्कोर असणाऱ्या व्यक्ती कर्ज मिळवण्यासाठी अधिक अनुकूल असतात.

CIBIL स्कोर कसा गणला जातो?

CIBIL स्कोर तुमच्या क्रेडिट अहवालातील माहितीवर आधारित असतो. कर्जदाराचे गेल्या 36 महिन्यांचे क्रेडिट प्रोफाइल तपासले जाते, ज्यात गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड्सवरील व्यवहार आणि पेमेंट हिस्ट्री यांचा समावेश असतो.

CIBIL स्कोर ऑनलाइन कसा तपासायचा?

CIBIL स्कोर तपासण्यासाठी खालील सोप्या पायर्या फॉलो करा:

  1. CIBIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. ‘गेट युअर CIBIL स्कोर’ पर्याय निवडा.
  3. तुमचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि आयडी प्रूफ (पासपोर्ट नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड) सबमिट करा.
  4. पिन कोड, जन्म तारीख, फोन नंबर सबमिट करा.
  5. ‘ऍक्सेप्ट अँड कंटिन्यू’ पर्याय निवडा.
  6. फोनवर आलेला ओटीपी सबमिट करा.
  7. डॅशबोर्डवर जाऊन तुमचा क्रेडिट स्कोर तपासा.

जर तुमची सर्व माहिती आणि कागदपत्रे बरोबर असतील तर तुम्ही तुमचा CIBIL स्कोर मोफत तपासू शकता.

तुमचा मोफत CIBIL स्कोर येथे तपसा

Leave a Comment