Aadhar Card: मतदान, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे, बँक खातं उघडणे, नवीन सिमकार्ड घेणे यासारख्या विविध कामांसाठी आधार कार्ड ओळखीचा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून वापरलं जातं.
लाडकी बहीण योजना:राज्य सरकारन नवीन एक जीआर काढला;हे झाले बदल
Aadhar Card: आधार कार्डच्या वापराने नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यात मदत होते. परंतु, अनेक लोक दरवर्षी पत्ता बदलतात किंवा आधार कार्डातील माहितीमध्ये चुका होत असतात. काही लोकांच्या बायोमेट्रिक तपशीलांमध्ये देखील त्रुटी असू शकतात, ज्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक ठरते.
सरकारने आधार कार्ड वापरकर्त्यांना जुनं आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे. 14 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन आधार अपडेट मोफत असेल, अशी माहिती यूआयडीएआयने आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवर दिली आहे.
तुमचा CIBIL स्कोर कसा सुधारावा; येथे तपासा CIBIL स्कोर: कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा घटक
पूर्वी ही मुदत 14 जून 2024 होती, पण आता ही तारीख 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ‘My Aadhaar’ पोर्टलवर ऑनलाइन अपडेट करण्याची मोफत सेवा उपलब्ध असेल. ऑफलाइन आधार अपडेटसाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.
Aadhar Card: Aadhar Card: आधार अपडेटसाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी पॅनकार्ड आणि पत्त्यासाठी मतदार कार्ड वापरता येईल. सरकारने तिसऱ्या वेळेस आधार कार्ड अपडेटची तारीख वाढवली आहे.
एसबीआयच्या खास एफडी योजना: 2 वर्षात श्रीमंत होण्याची संधी
आधार अपडेटसाठी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in/ वर जाऊन ‘अपडेट आधार’ पर्यायावर क्लिक करा. आपल्या आधार नंबर आणि ओटीपी भरून लॉगिन करा. दस्तऐवज अपडेटवर क्लिक करून तपासा.
स्कॅन केलेले ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये अपलोड करा. नंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा. एक रिक्वेस्ट नंबर जनरेट होईल, ज्याचा वापर करून तुम्ही आधार अपडेटची स्थिती तपासू शकता.